रविवार, ६ मार्च, २०२२

भस्मांगराग

भस्मांगराग... सृजन म्हणजे ईश्वर आणि विलय म्हणजे राक्षस...!!! छे छे... सृजन म्हणजे ईश्वर आणि विलय म्हणजेही ईश्वर... सृजन आणि विलय दोन्हीही ईश्वरी विलास... राक्षस, दानव, अनीश्वर असं काही नाहीच... केवढी विशालता, केवढी सूक्ष्मता, केवढी चिंतनशीलता... एकमेव अविनाशी असलेल्या काळावरही ज्याची हुकूमत चालते असा हा देव, देवाधिदेव... महाकाल... महारुद्र... रौद्राला, भीषणतेलाही छातीशी धरण्याची शक्ती देणारा... मृत्युंजय शिव...

- श्रीपाद कोठे

७ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा