दोन माणसे समोरासमोर येतात आणि हस्तांदोलन करतात. बाजूचा एक माणूस मुद्दा उपस्थित करतो, `तुम्ही कोणत्या हाताने हस्तांदोलन केले?' दोघेही उत्तर देतात, उजव्या हाताने. बाजूचा माणूस म्हणतो, `हे कसे शक्य आहे?' दोघेही प्रश्नार्थक पाहतात. तो म्हणतो, `याचा उजवा हात या दिशेला आहे आणि तुझा उजवा हात त्या दिशेला आहे. मग दोघांचेही हात उजवे कसे? याची उजवी बाजू ही आणि तुझी उजवी बाजू ती हे कसे?' तो बाजूचा माणूस बुद्धिवादी होता म्हणतात.
- श्रीपाद कोठे
२ मार्च २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा