मंगळवार, १ मार्च, २०२२

हिंद स्वराज

राजकारण, न्यायव्यवस्था, प्रसार माध्यमे यांची चर्चा आजकाल खूप होते. कोणीही याबाबत समाधानी नाही. उपाय तर दूरची गोष्ट किमान याचं स्वरूप तरी स्पष्ट व्हायला हवे. तेही होत नाही. एक सुचवावेसे वाटते - महात्मा गांधी यांचे 'हिंद स्वराज' किमान एकदा वाचून पाहावे. गांधीजींनी देश तोडला, त्यांनी मुस्लिमांना डोक्यावर बसवले, त्यांनी हिंदू आणि हिंदुस्थान यांच्याशी द्रोह केला, आंबेडकर- सावरकर- क्रांतिकारक- यांच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष होता; इत्यादी इत्यादी सगळं काही क्षण बाजूला ठेवून हे पुस्तक वाचावे. मुख्य म्हणजे एकूण विवेचन वाचतानाच त्याचं जे मूळ कारण त्यांनी नमूद केलं आहे ते अवधान देऊन लक्षात घ्यावे. ते पक्के गांधीवादी सुद्धा दुर्लक्षित करतात हे दुर्दैवी आहे.

- श्रीपाद कोठे

२ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा