- निर्बंध हे नियम म्हणून असले की त्याचा जाच वाटतो आणि ते न पाळण्याची वृत्ती तयार होते. पण निर्बंध हे व्यवस्था म्हणून असले की ते सहज पाळले जातात.
- नियम असतात तेव्हा, नियम करणारे आणि पाळणारे असे भाग होतात. नियम करणारे 'आम्ही कोणी तरी आहोत' या भावनेने आणि विचाराने वागत, बोलत, विचार करत असतात. नियम पाळणारेही मूकपणे ते गृहित धरत असतात.
- व्यवस्था असते तेव्हा ती सगळ्यांची असते. त्यामुळे 'आम्ही विशेष' ही भावना वा विचार नसतो.
- हे केवळ शासन, प्रशासन एवढ्यापुरतेच नसते, तर एखादी संस्था, एखादा कार्यक्रम, एखादे मंदिर; या ठिकाणीही याचा अनुभव घेता येऊ शकतो.
- निर्बंध ही व्यवस्था म्हणून असेल आणि राहायची असेल तर त्यासाठी वृत्ती आध्यात्मिक लागते. त्याशिवाय 'आम्ही विशेष' ही भावना वा विचार बाजूला सारता येत नाही.
- 'निर्बंध म्हणजे व्यवस्था' हे शेगाव संस्थानात अनुभवता येते.
- 'निर्बंध म्हणजे नियम' हे कुठेही अनुभवता येऊ शकते. अगदी घरातसुद्धा.
- श्रीपाद कोठे
८ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा