गुरुवार, ३ मार्च, २०२२

कोरोना आणि होळी

कोरोनाची धास्ती आणखीन वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांनी तर होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय पण जाहीर केला आहे. याच गदारोळात एक वैज्ञानिक मतही वाचनात आलं आहे. भारतात गर्मीला सुरुवात झाली आहे. कोणताही व्हायरस जास्त गर्मीत फारसा टिकाव धरत नाही. त्यामुळे भारतात या धोक्याला काही प्रमाणात नैसर्गिक रीतीनेच आळा घातला जाईल. एक वाटते की, येणाऱ्या होळीचा या संदर्भात विचार करावा. तसेही कृमी कीटक आटोक्यात ठेवणे हाही होळीचा एक उद्देश सांगितला जातोच. त्यामुळे होलिका दहन मोठ्या प्रमाणात करावे. प्रदूषण, झाडे यांचा जास्त बाऊ करू नये. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरीही त्यासाठी अन्य बरेच उपाय आहेत. आपले मोह आणि दुबळेपणा यावर फक्त मात करावी लागेल. अन आपल्याला हे करावेच लागेल. तेव्हा सध्या तरी होलिका दहन अधिकाधिक ठिकाणी करावे. सध्या पानगळ सुरू आहे. तीही प्रशासनाने पुढाकार घेऊन जागोजागी जाळावी. वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रयत्नांना पारंपरिक शहाणपणाची जोड द्यायला काहीच हरकत नाही.

- श्रीपाद कोठे

४ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा