न्या. गोगोई यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले. उलटसुलट राजकीय चर्चा झडतील. त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. पण अन्य काही मुद्दे यातून पुढे येतात. त्यावर समाज म्हणून विचार केला पाहिजे. न्या. गोगोई सरन्यायाधीश होते. राष्ट्रपतींना शपथ देण्याचा त्यांना मान होता. सर्वोच्च अशा संसदेच्या निर्णयांची चिकित्सा करण्याचे, त्यावर भाष्य करण्याचे, प्रसंगी निर्णय बदलायला लावण्याचे, कोणत्याही कायद्याची घटनात्मकता निश्चित करण्याचे; असे सारे अधिकार होते. राज शिष्टाचारात राष्ट्रपतींच्या नंतर त्यांना मान होता. पद, पैसा, सन्मान, अधिकार हे सगळे होते. एवढे सारे मिळाल्यावर, भोगल्यावर - अदखलपात्र, सामान्य मंत्र्यापेक्षाही कमी अधिकार आणि सन्मान असणारी, राष्ट्रपती वा पंतप्रधान यांच्या उपस्थितीत हाताची घडी तोंडाला कुलूप करावे लागणारी खासदारकी भुरळ कशी आणि का घालू शकते? आपलं मानव म्हणून इतकं अवमूल्यन झालं आहे? हीच जर आपली सामाजिक मूल्य असतील तर मोठ्या तात्त्विक, नैतिक गोष्टी करण्याचा अधिकार आम्ही गमावून बसलो आहोत, हाच त्याचा अर्थ होतो. अन कृपा करून व्यक्तीस्वातंत्र्य, कायदेशीरपणा इत्यादी सांगू नये. त्यांचा भंपकपणा आणि त्यांची निरर्थकता शेंबडे पोरसुद्धा जाणते. एकूणच हा निर्णय आणि तो स्वीकारणे निराशाजनक आहे.
#श्रीपादचीलेखणी
हे आपले सर्व कथन त्याच वेळी लागू पडते ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढविली वा अर्ज केला.
ही महामहिम राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ देशाला व्हावा यासाठी महामहिम जे १२ लोक नियुक्त करतात. त्यातील ही नेमणूक असेल तर त्यात आक्षेपार्ह काय आहे?
(स्वानंद पुंड)
विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड नाकारता आला असता प्रस्ताव. अन मुद्दा अनुभव आणि ज्ञानाच्या लाभाचा. त्यासाठी अनेक पर्याय आहेत. सिझरची बायको....
Shripad Kothe
भारताचे महामहिम राष्ट्रपतींनी दिलेला सन्मान का नाकारायचा?
तो त्यांचा अपमान नाही का?
ज्ञानाच्या उपयोजनाची अनेक क्षेत्रे आहेत. बरोबर. पण याने ती बंद कुठे होतात.
विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड तुकारामांनी शिवाजींचा नजराणा नाकारला होता. रामशास्त्रीनी पण.
मानवी स्वभावाचा नमुना दाखविणारा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. 20--25 वर्षांपूर्वी चा प्रसंग जेव्हा नागपूरात स्वत:चे नवीन चारचाकी वाहन असणे व ते चालविणे खूप प्रतिष्ठेचे असायचे. नेहमी स्वत:ची कार चालविणाऱी एक सुपरीचित महिला मला पेट्रोल पंपावर भेटली. तेव्हा ती नवीन स्कूटर वर होती. मी हाय हॅलो केले पण तिच्या स्कूटर ची दखल घेतली नाही कारण ती नेहमी कार मध्ये फिरणारी महिला होती. हाॅ, ती जर सायकल किंवा आॅटोने फिरणारी असती तर मी नक्कीच तिच्या प्रगतीची दखल घेतली असती. पण तिला माझा हा मठ्ठपणा सहन झाला नाही. न राहवून तिने तिच्या नवीन स्कूटर कडे निर्देश करून म्हटले ,"नवीन घेतली, कशी आहे?"
निवृत्त सर न्यायाधीश पदा पेक्षा विद्यमान खासदार पद त्यांना जास्त भावले असेल.
Suresh Khedkar धन्यवाद. माझ्या म्हणण्याची पुष्टी करण्यासाठी. हाच माझा मुद्दा आहे. माणसे सर्वार्थाने लहान आणि सुमार होऊ लागली आहेत. अन 'लहान माणसांचे महान राष्ट्र' यात समाज वाहत जातो आहे. महानतेची किंमत असते. ती चुकवण्याची तयारी नाही.
तुमचा मुद्दा हास्यास्पद आहे. मोठे पद भूषविले नंतर लहान पद स्वीकारण्यात कमीपणा तो कसला? संघात रज्जुभैय्या, सुदर्शनजी यांनी सरसंघचालक पद सोडल्यानंतर स्वयंसेवक होतेच आणि संघांनी दिलेली जवाबदारी पार पाडली. चाणक्याने chandraguptala सम्राट बनवून पुनः शिक्षक पद स्विकारले,
तर गोगोई ना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर मनोनित केले तर एवढा gahjab का?
(महेश जोशी)
Mahesh Joshi महेशराव, त्याग आणि लाभाचे पद यात फरक असतो नं. अन कुठली तुलना कुठे करताय? कुठे रज्जूभैय्या अन कुठे गोगोई. माझा मुद्दा हास्यास्पद असो. पण तुमच्या तर्काला लोक नक्कीच हसतील.
मला वाटलेच तुम्ही ज्यांशी तुलना केली त्यावरच टिप्पणी करणार. खरेच त्या महनीय व्यक्तींशी गोगोई यांची काही बरोबरी नसेल, ते मी केवळ उच्चपदस्थ व्यक्ती निवृत्त झाल्यावर सामान्य पातळीवर काम करू शकतो एवढे संगण्यापूर्तेच होते.
तसेही कोणतेही पद हे ठरवले तरच स्वलाभाचे होवू शकते अन्यथा लोकांसाठी, देशासाठी लाभदायक होवू शकते. गोगोई यांच्या नियुक्ती कडे पूर्वग्रदूषित नजरेने का पहावे?
Mahesh Joshi तुम्हाला बहुतेक पोस्टचा भाव कळलेला नाही. हे फक्त लहान मोठं नाही. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे व्रतस्थता. जी भारतीय जीवनाची विशेषता आहे. एका व्यक्तीची व्रतस्थता अन्य हजारो, लाखो लोकांना प्रेरणा आणि आधार देते. अशी व्यक्ती मोठ्या पदावरील असेल तर त्याचा प्रभाव आणखीन मोठा होतो. मी गोगोईंकडून (तशा लोकांकडून) ती अपेक्षा ठेवतो एवढेच. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे त्यांच्यावर किंवा कोणावर दडपण नाही. पण समाजाच्या downfall मध्ये कायदे अन व्यवहार यापलीकडे जाऊन विचार व्यवहार करणारे जास्त हवेत ही माझी भूमिका आहे. दुसरे म्हणजे, राजकारण आणि राजकीय व्यवस्था यांचा मोह/ भुरळ/ ओढ/ महत्व. आमच्या मनात ते इतकं भिनलं आहे की कमालीच्या बाहेर. समाजाच्या depoliticization साठी वेगळा व्यवहार करणारे आणि वेगळा विचार मांडणारे हवेत. बाकी ज्याला जे वाटते ते त्याने करावे. I am least enamoured by politics.
- श्रीपाद कोठे
१७ मार्च २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा