आपल्याला देव हवा असतो. आपली रडगाणी ऐकणारा, आपला त्रागा सहन करणारा, आपले रागलोभ समजून घेणारा, आपल्या एकटेपणात साथ देणारा, आपल्या हाकेला ओ देणारा किंवा धावून येणारा. तेही तोंड बंद ठेवून करणारा. स्वत:बद्दल कणभरही न बोलणारा. responsive reaction देणारा, reactive response न देणारा. आपला होणारा.
पण...
आपल्याला देव व्हायचं नसतं. रडगाणी ऐकणारा, त्रागा सहन करणारा, रागलोभ समजून घेणारा, साथ देणारा, ओ देणारा किंवा धावून जाणारा. तोंड बंद ठेवणारा. स्वत:बद्दल न बोलणारा. responsive reaction देणारा, reactive response न देणारा. कुणाचा होणारा.
- श्रीपाद कोठे
६ मार्च २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा