१) तंत्रहीनता?
२) चौकटहीनता?
३) गोंधळ?
४) मर्यादाहीनता?
५) समन्वयहीनता?
६) संवादहीनता?
७) मनात येईल तसे वागणे?
८) `मी' (माझे विचार, माझे वागणे, माझे वाटणे) शिवाय अन्य सगळ्याचे अस्तित्व, अन्य सगळ्याचे असणे, अन्य सगळ्याची सत्यता नाकारणे?
९) दुसऱ्याचा विचार न करणे?
१०) कालच्या व्यवस्था, विचार, शैली, माणसे, वस्तू, जगणे, कल्पना, संकल्पना, तत्वे; कालची आहेत म्हणून अट्टाहासाने नाकारणे?
वरील प्रश्नांचे काही संदर्भ-
१) आम आदमी पार्टी
२) बहुसंख्य तरुण मुलामुलींचे वागणे, बोलणे, विचार करणे.
३) नक्षलवादींचे समर्थन करणारे मानवतावादी.
४) जुन्या पद्धतीने जगणाऱ्या महिलांना गुलाम ठरवणारे स्त्रीवादी.
५) कुठेही थुंकणारे, रांग मोडून पुढे घुसणारे, वाहतुकीचे नियम मोडणारे, सार्वजनिक मालमत्तेची फिकीर न करणारे.
- श्रीपाद कोठे
१२ मार्च २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा