६०० कलाकार आणि साहित्यिकांनी नरेन्द्र मोदींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या लोकांनी राजकीय भूमिका घेतली आणि ती स्पष्टपणे मांडली. यात आक्षेप घेण्याचे कारण नाही. तो त्यांचा अधिकार आहे पण त्याचवेळी सरळ राजकारणात उतरल्याने त्यांच्या भूमिकेवर राजकीय प्रतिक्रिया देण्यातही गैर काही नाही. त्यामुळे माझी प्रतिक्रिया ही की, या लोकांना मोदी विरोधकांकडून काही आश्वासन मिळाले असू शकते. दुसरे म्हणजे, आपला राजकीय कल इतक्या स्पष्टपणे जाहीर केल्याने त्यांच्या सगळ्या भूमिकांकडे (किमान भविष्यातल्या) निखळ मानवीय चिंतन म्हणून पाहता येणार नाही. अन तिसरी बाब म्हणजे, media regulation करण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर या लोकांचे काय म्हणणे आहे?
- श्रीपाद कोठे
६ एप्रिल २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा