वाहिन्या बदलता बदलता 'सेंटिमेंटल' दिसला अशोक सराफचा. अगदी शेवटला प्रसंग. कामगिरी फत्ते केल्याबद्दल पुरस्कार आणि सोबतच 'मानसिक अक्षम' असल्याचे प्रमाणपत्र देऊन बोळवण. त्या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या तोंडी छोटंसं भाषण आहे. ते म्हणतात - 'पोलिसांनी मेंटल होऊ नये असं वाटत असेल तर त्यांच्याकडे सेंटिमेंटल होऊन पाहा.' याच भाषणात सुरुवातीला पोलीस आणि समाज यांच्या संबंधांवर ते बोलतात. म्हणतात - 'पोलिसांवर भार का येणार नाही? लोक आजकाल एकमेकांना समजून घेणे, सांभाळून घेणे विसरले आहेत. घरून बाहेर पडतात तेच एकमेकांशी भांडणाच्या तयारीने.'
खरं तर या दोन्ही गोष्टी अतिशय मूलभूत आणि मार्मिक आहेत. पण त्या फक्त कलाकृतीचा भाग बनून राहतात. अशा गोष्टी ना आमच्या विचारांचा भाग होत ना जीवनाचा. काय कारण/ कारणे असावे/ असावीत?
- श्रीपाद कोठे
४ एप्रिल २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा