श्रीरामायण ही सत्याच्या विजयाची कथा आहे, सत्याच्या वर्चस्वाची नाही. अनेकदा विजय मिळवूनही वर्चस्व स्थापन होत नाही आणि बहुतेकदा वर्चस्व स्थापन होऊन विजय मिळत नाही. जगभरातल्या काही देशात कम्युनिझमने वर्चस्व स्थापित केले होते, पण कम्युनिझम विजयी झाले नाही. हिंदुत्वाने वर्चस्व स्थापित केले नसेल पण हिंदुत्व नेहमीच विजयी ठरले आहे. विजयाची ही प्रक्रिया रामायणाने पूर्ण झाली नव्हती आणि अजूनही पूर्ण झालेली नाही. सत्याच्या विजयाची ही प्रक्रिया वर्चस्वापेक्षा वेगळी आहे हे प्रभू रामाने सगळ्यांना समजावून सांगावे.
- श्रीपाद कोठे
८ एप्रिल २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा