शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

जबाबदारी

स्वातंत्र्याची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी, अन अर्थातच कठीण पूर्वअट आहे- जबाबदारी. गंमत म्हणजे ती पूर्वअट वगळूनच बहुतेकदा स्वातंत्र्य हवं असतं. राज्य घटनेतसुद्धा `अधिकार' आणि `कर्तव्ये' यांची चर्चा आहे. पण तीही बहुतेक जबाबदारीच्या अभावी लुळीपांगळी झालेली पाहायला मिळतात. घटनेत `जबाबदारी' अंतर्भूत करूनही फार काही साधले जाणार नाही अन तसे ते अंतर्भूत करूही नये. कारण जबाबदारी अशी लिहून, चर्चा करून, शब्दांच्या माध्यमातून निर्माण नाही केली जाऊ शकत. उलट तिला शब्दात बांधायला गेलो तर त्यातून बेजबाबदारपणाच पदरी यायचा. जबाबदारीचंही थोडं प्रेमासारखंच आहे. ते का असं कर म्हणून करता येतं?

- श्रीपाद कोठे

९ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा