बुधवार, ६ एप्रिल, २०२२

अंत्योदय

घरी दोन कंपन्यांचे गॅस कनेक्शन होते. माझ्या नावाचे कनेक्शन सर्व्हिस efficient नसल्याने परत केले. वडिलांच्या नावाचे कनेक्शन माझ्या नावाने transfer करण्याचा फॉर्म भरून दिला. कागदपत्रे दिली. घरी आल्यावर एजन्सीतून फोन - तुम्ही दिलेला ifsc code valid नाही. Reject होतो आहे. बँकेचा कोड, अकाउंट स्टेटमेंटवरील कोड, मी लिहिलेला कोड, फोनवर पुन्हा सांगितलेला कोड; सगळे एकच. पण invalid. पलीकडल्या माणसाची सूचना नवीन अकाउंट काढा. नवीन अकाउंट काढायचा किंवा नाही हे पाहू पण

१) कंपनीकडे नोंद का नाही?

२) कंपनीकडे नोंद असलेल्या बँकेतच खाते असायला हवे का?

३) कंपनीकडे कोणत्या बँकेच्या कोणत्या शाखा नोंद केलेल्या आहेत हे पाहून मग खाते उघडायचे का? हे कसे शक्य आहे?

४) आधीपासून असलेले खाते आणि अन्यत्र काम करणारा त्याचा ifsc code, अमुक गॅस कंपनीकडे का चालू नये?

५) याला भोंगळपणा या शब्दापेक्षा तीव्र शब्द कोणता?

६) असाच राहणार का आत्मनिर्भर भारत?

७) प्रत्येक गोष्टीत अखेरचा माणूसच का भरडला जातो?

८) शेवटच्या माणसाचा विचार करून योजना करणे म्हणजे अंत्योदय. शासन प्रशासन खरंच त्या पद्धतीने काम करतं का?

- श्रीपाद कोठे

७ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा