शनिवार, २ एप्रिल, २०२२

कवितेत असणे

 - मी फोन केला होता चार दिवसांपूर्वी तुला.

- हो.

- घेतला नाही तू.

- अरे त्यावेळी मी कवितेत होतो.

- म्हणजे?

- कविता माझ्यात होती?

- म्हणजे?

- अरे... मला कविता होत होती.

- जाऊ दे रे. मला काही कळत नाहीय. पण तू एक का करत नाही... कवितेची वेळ का ठरवून टाकत नाही. म्हणजे जेवण, झोप, व्यायाम यांच्या वेळा आपण ठरवतो तसं.

************

बुद्धिवाद पण सृजनशील असतो म्हटलं !!!

- श्रीपाद कोठे

३ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा