नुकतीच एक गमतीशीर माहिती वाचनात आली. मलोपचाराबद्दल. काय दचकलात का? पण होय मलोपचाराबद्दलच. प्रत्यक्ष मानवी व्याधींवर मानवी विष्ठेने उपचार. आपण शेण व मातीचे उपचार अजून स्वीकारू शकलो नाही, पण जग त्याहीपुढे जात आहे. सुमारे १० वर्षांपासून मलोपचाराचे प्रयोग सुरु आहेत. मलदान, मलपेढी, मलरोपण हे सगळे प्रत्यक्षात आहे. त्यामागील तत्व विचारात घेण्यासारखे आहे. सभ्यता आणि स्वच्छता यांचा इतका अतिरेक होऊ लागला आहे की, आपण सर्व जीवाणू नष्ट करू लागलो आहोत. पण हे आरोग्यासाठी घातक आहे. अनेक जीवाणू आरोग्यासाठी, आरोग्यरक्षणासाठी आवश्यक असतात. मानवी विष्ठेतील अशा जीवाणूंचा उपयोग या उपचार पद्धतीत केला जातो. पोटाचे, पचनसंस्थेचे विकार, पार्किन्सन सारखे विकार, रोगप्रतिकारक शक्ती परत मिळवणे यासाठी हे उपचार केले जातात. नेचर, न्यू सायंटिस्ट सारख्या नियतकालिकातून या विषयाची चर्चा सुरु झाली आहे आणि या उपचारांच्या संशोधनाला मदत वगैरेही मिळू लागली आहे.
- श्रीपाद कोठे
८ एप्रिल २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा