सोमवार, ४ एप्रिल, २०२२

राजकारण निवृत्ती

अडवाणीजी, जोशीजी, सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीवरून बरीच चर्चा सुरू आहे. अडवाणीजींनी तर काल ब्लॉग लिहून आपले मतही मांडले. त्याचीही बातमी झाली. मात्र या सगळ्यात वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांची चर्चा का होत नाही? राजकारण हा जीवनाचा भाग न राहता जीवनच का व्हावा? हे भारतीय समाजाचे स्खलन नाही का? अडवाणीजींनी जी भूमिका मांडली ती सुद्धा पुरेशी नाही. त्यात अनिच्छा डोकावतेच. याचाच अर्थ जीवनाचा पोत बदलला आहे. स्वतःला indispensable न समजणे पुरेसे नाही आणि ते फारसे सकारात्मक देखील नाही. मनापासून, विचारपूर्वक बाहेर पडता यायला हवे. सत्तेला चिकटून राहण्याची इच्छा किंवा तसे होऊ शकत नसेल तेव्हा विरोधक वा लोकांकडून होणाऱ्या स्तरहीन चर्चा दुर्लक्षित करून, बाजूला सारून निवृत्त होण्याचा विचार आणि परंपरा सुरू व्हायला हवी. खरं तर आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद, प्रधानमंत्री पद यांच्यासाठी सुद्धा किती वेळा एखाद्याला होता येईल यावर मर्यादा कायद्यानेच यायला हवी.

एकंदर समाजाने सुमारपण सोडण्यासाठी आपल्याला खूपच वाव आहे.

- श्रीपाद कोठे

५ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा