खासदारांचा क्षेत्र विकास निधी दोन वर्षांसाठी गोठवण्यात आला आहे. केंद्र सरकारचा अतिशय चांगला निर्णय. याचा अर्थ ८ हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत वाढणार. याचा विनियोग देखील निश्चित आणि नीटपणे व्हावा. एक कल्पना -
देशभरात पाचशे स्थानी (देशभरातील जिल्हे) सर्व सोयींनी युक्त, सगळ्या रोग आणि व्याधींवर उपचार होऊ शकतील अशी, पुरेशी मोठी इस्पितळे उभारावीत. या सगळ्या ठिकाणी जागा आणि वैद्यकीय रुग्णालये आहेतच. केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन यांचे अधिकार आणि ताबा यातून emergency पद्धतीने मार्ग काढून; उपलब्ध असलेल्या जागांचा उपयोग करता येईल. दोन वर्षांच्या खासदार निधीतून प्रत्येक रुग्णालयासाठी १६ कोटी रुपये उपलब्ध होतील. शिवाय राज्यांनी आमदार क्षेत्र विकास निधी याच कामाकडे वळवावा. यातून मोठा निधी उपलब्ध होईल आणि भविष्याच्या दृष्टीने खूप मोठे आणि महत्वाचे काम होईल. यासाठी कुरकुर वा विरोध करणाऱ्या खासदार वा आमदारांना जनतेनेच जाब विचारावा आणि बाध्य करावे.
- श्रीपाद कोठे
६ एप्रिल २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा