वैशाख शुद्ध पंचमी
आदि शंकराचार्य यांची जयंती.
त्यांनी रचलेले निर्वाणषटक. केवळ सहा श्लोकांमध्ये अध्यात्माच्या 'अस्ति' 'नास्ति' दोन्हीचा मेळ घालून केवल सत्याचं दर्शन घडवणारे हे षटक. यासोबतच जीवनविषयक असंख्य प्रश्नांची सोडवणूक करणारे, नित्याचं जीवन जगताना समोर उभे ठाकणाऱ्या असंख्य साध्या वा कूट प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत करणारे, जीवनाला पूर्णतेकडे घेऊन जाण्याची अपार शक्ती असलेले हे सहा श्लोक - निर्वाणषटक.
मात्र भाषेचा फरक किती पडू शकतो ते आज आणखीन जाणवले. इंग्रजीत nirvan shatak असे लिहिल्यास 'शतक' होण्याची शक्यताच जास्त. ते 'षटक' राहण्यासाठी संस्कृत वा मराठीतच हवे. शतक आणि षटक - केवढा फरक पडतो भाषेने !!
- श्रीपाद कोठे
२० एप्रिल २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा