गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

उन्हाळा

दिवसेंदिवस उन्हाळा वाढतो आहे. एकूणच तापमान वाढतं आहे. गेली कोट्यवधी वर्षे सूर्य तोच आहे. तशीच आग बरसतो आहे. उलट सूर्य थंड होत चाललाय असं काहींचं मत आहे. तरीही उष्णता वाढते आहे. हे सगळं समजतं, पण काच, सिमेंट-काँक्रीट, टाईल्स, धातू हे उष्णता शोषून न घेता reflect करून उलट पुन्हा वातावरणात उत्सर्जित करतात; हे आंम्हाला समजत नाही का? की या साऱ्या गोष्टी उष्णता शोषून घेत नाहीत हे माझं वाटणंच चुकीचं आहे? उष्णता शोषून घेण्यासाठी माती, झाडे आणि पाण्याचे साठे हवेत आणि काच, सिमेंट-काँक्रीट, टाईल्स, धातू कमी करायला हवेत, हे माझं वाटणंच कदाचित चुकीचं असेल. कुणास ठाऊक...

- श्रीपाद कोठे

८ एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा