१) एखाद्याच्या प्रत्येक गोष्टीला मान तुकवणे?
२) प्रत्येक मुद्यावर सहमत होणे?
३) वेगळे मत व्यक्त न करणे?
४) आपले म्हणणे पटवून न देणे?
५) फक्त गोडच बोलणे?
६) चूक वा मर्यादा दाखवून न देणे?
स्वातंत्र्य जपणे म्हणजे काय?
१) प्रत्येक गोष्टीत विरोध करणे?
२) प्रत्येक मुद्यावर असहमती दर्शवणे?
३) आपलेच म्हणणे दामटणे?
४) फक्त कडवट, कुत्सित वा शिवराळ बोलणे?
५) सतत पाणउतारा करणे?
६) टवाळी करणे, टोमणे मारणे? (बरा शब्द आठवला - टॉन्ट शब्द आपण खूप वापरतो, त्याला `टोमणे' हा पर्याय देता नाही का येणार?)
- श्रीपाद कोठे
४ एप्रिल २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा